घर बांधकाम पडले महागात! उपसरपंच पायउतार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अल्लीपूर : गाडेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून घराचे पक्के बांधकाम करणाऱ्या गाडेगावच्या उपसरपंचाला जिल्हाधिकार्‍यांनी उपसरपंच पदावरून पायउतार केले आहे. संघपाल इूबइूबे असे पायउतार झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे.

हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणारी गाडेगाव ही आठ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. येथे उपसरपंच म्हणून संघपाल इूबडूबे हे कार्यरत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय जागेवर अतिक्रमण करुन घराचे पक्के बांधकाम केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी अंती जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपसरपंच संघपाल डूबडूबे यांना उपसरपंच तसेच श्रा.पं. सदस्य पदासाठी अपात्र ठरविले.

संजय गिरी यांनी या प्रकरणी सरपंच सविता भोयर व उपसरपंच संघपाल टूबडूबे यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. चौकशीत सरपंच सविता भोयर व उपसरपंच संघपाल डुबडूबे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले हे सिद्ध झाल्याने उपसरपंच संघपाल डूबडूबे यांच्याविरोधात जिल्हाधिकार्‍यांनी आदेश पारित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here