महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी! पोलिसात तक्रारा दाखल

वर्धा : थकीत वीजबिलाची वसूली करण्यास गेलेल्या वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. इंदिरा मार्केट परिसरात ही घटना घडली.

खूशाल कडमधाड हे वरिष्ठ तंत्रज्ञ राहूल आष्टणकर याच्यासोबत सकाळच्या सुमारास वीजबिलाची थकीत रक्‍कम वसूल करण्यासाठी इंदिस मार्केट परिसरात असलेल्या निशिकांत देवेंद्र कुंभलवार याच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे फेब्रुवारी २०२१ पासूनची थकबाकी आहे. रकमेचा भरणा करा, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगितले असता मी माझ्या मर्जीप्रमाणे बिल भरले तु येथून निघुन जा असे म्हणुन शिवीगाळ केली. दरम्यान वीजपुरवठा खंडीत करण्यास सांगितले असता निशीकांतने मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रारा दाखल करण्यात आली आहे.

सध्या महावितरण कार्यालयाकडून थकीत वीजबिलाची वसुली मोहीम सुरु आहे. अशातच ग्राहकांच्या घरी वीज देयकं वसूल करण्यास गेलेल्यांना धक्काबुक्कीसह मारहाणीच्या घटना समोर येऊ लागल्या आहे. याकडे गांभीर्याने बघण्याची मागणी वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here