नादूरुस्त टिप्परला मालवाहू धडकला! सिरसगाव रस्त्यावरील अपघात: पोलिसांत तक्रार दाखल

अल्लीपूर : वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांतही वाढ होत चालली आहे. नादुरुस्त टिप्पर रस्त्याकडेला उभा असताना मागाहून भरधाव येणारी मालवाहू वाहन टिप्परवर जाऊन धडकल्याने मालवाहू वाहनाचे नुकसान झाले. हा अपघात अल्लीपूर ते सिरसगाव रस्त्यावर झाला. टिप्पर चालकाने याबाबतची तक्रार पोलिसांत दिली.

अल्लीपूर ते सिरसगाव रस्त्यावर (एमएच १२ एव्ही ७८६०) क्रमांकाचा टिप्पर नादुरुस्त स्थितीत उभा होता. दरम्यान, मागाहून येणाऱ्या (एमएच ३१ डीएस ५५२२८) क्रमांकाच्या मालवाहू चालक सूरज चौधरी याचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने मालवाहूने टिप्परला धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनाचे नुकसान झाले. टिप्पर चालक एस. मेश्राम यांनी याबाबतची तक्रार अल्लीपूर पोलिसांत दिली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here