साईनाथ ब्लड बॅकच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन! कै. शालिग्राम जोशी यांच्या स्मृतिदीन साजरा

सिंदी (रेल्वे) : शहरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक राजकीय क्रिडा व्यापार आणि धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात विविध जबाबदार्‍या पार पाडणारे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी कै. शालिग्राम जोशी यांचा बुधवार (ता. २१) ला पहीला स्मृतीदिन साजरा करण्यात आला. गोरगरीबांच्या मद्दतीसाठी नेहमी पुढाकार घेणार्‍या कै. जोशी यांच्या पहील्या स्मृतिदिनानिमित्त मित्र परिवार एकवटला आणि भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करुन स्मृतींना उजाळा देऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

या रक्तदान शिबीर कार्यक्रमाला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत काळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सिध्देश्वर महाजन आणि डाॅ. लिलाधरजी पालीवाल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.

सर्वप्रथम कै. शालिग्राम जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांनी दिप प्रज्वलन केले. साईनाथ ब्लड बॅक नागपूरचे डॉ संजय बारगवाने आणि त्यांच्या चमुने उत्कृष्ट नियोजन करुन शिबीर यशस्वी केले.  शिबीरात ५१ रक्तदात्यानी रक्तदान केले मात्र नुकतीच कोरोना लस घेतलेल्या तीस हुन अधिक तरुनांना रक्तदान करता आले नसल्यांने या तरुणांचा हीरमुस झाला. सर्व रक्तदात्याना साईनाथ ब्लड बॅकेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन प्रसंगी गौरविण्यात आले. तर मित्र परिवारातर्फे अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन तथा प्रस्तावना मोहन सुरकार यांनी केली तर उपस्थीतांचे आभार यशवंत बडवाईक यांनी मानले. यावेळी आनंद छाजेड, गुल्लू भन्साली, रमेश वडांद्रे, राजु निनावे, दुर्गेश जोशी, यशवंत सोनटक्के, अनिल बाकडे, चंदु वाघमारे, शशांक जोशी, चंपु भन्साली आदीनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here