पवनारात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद! सर्वेक्षण करण्यासाठी कुणीही तयार नाही; नागरिकांत अफवा

पवनार : ६० वर्ष वरील व इतर आजार असणारे ४५ वर्षावर असणाऱ्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले असले तरी नागरिकांचा अल्प प्रतिसाद आहे. लसीकरणासाठी शासकीय रुग्णालयात तासन्‌तास वाट पाहावी लागत असल्याने व लसीकरणाबाबत सुरू असलेल्या अफवामुळे नागरिकांचा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते. कोरोनाचा प्रभाव कमी करावयाचा असेल तर लसीकरण होणे जरजेचे आहे. १ एप्रिलनंतर ४५ वर्ष वरील सर्वांना सरसकट लसीकरण होणार असल्याचे केंद्र सरकारने आधीच जाहीर केलेले आहे. लसीकरण वाढावे म्हणून प्रशासनाने ग्राम पंचायतकडे जबाबदारी सोपवली असुन त्यांनी सर्वे करून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी तयार करावयाचे आहे.

अंगणवाडी सेविका म्हणतात आमची जबाबदारी नाही सर्वे करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्राम पंचायत प्रशासनाने केले असले तरी ते आमचे काम नाही म्हणून जबाबदारी झटकली असून रजिस्टरसुद्धा परत केलेले आहे. कोरोनामुळे सध्या अंगणवाडी बंदच आहे. त्यामुळे या देशकार्यात अंगणवाडी सेविकांना मदत करण्याचे आवाहन सरपंच शालिनी आदमाने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here