ऑटो उलटून एक ठार! सहा जखमी; ढोल्या नाल्याजवळील घटना

वर्धा : ऑटोरिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून, इतर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना खरांगणा पोलिस ठाण्यांतर्गत आंजी मोठी येथील ढोल्या नाल्याजवळ २६ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.

शंकर वाघमारे हे आठवडी बाजार करण्यासाठी २६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता आंजी (मोठी ) येथे गेले होते. बाजार करूनसंध्याकाळी ७ वाजता ऑटो क्रमांक एमएच ३१, सीव्ही ५४२५ ने परत येत असताना बोरगाव- सावळी रोडवरील ढोल्या नाल्याजवळ आंजीकडून पेठकडे ऑटो येत असताना सांयकाळी ७ वाजताच्या दरम्यान, पलटी झाला. या अपघातात शंकर वाघमारे हे गंभीर जखमी झाले होते. तर इतर पाच ते सहा व्यक्‍ती किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या शंकर वाघमारे यांना आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना रुग्णावाहिकेने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

शंकर वाघमारे यांचा रात्री ८.३० वाजता रुग्णालयात उपचारादरम्यान मुत्यू झाला. या प्रकरणी प्रज्वल दिंगबरराव वाघमारे रा. पेठ आंजी मोठी याने दिलेल्या फिर्यादीवरून ऑटो क्रमांक एम.एच. ३१ सीव्ही ५४२५ च्या चालकाविरुद्ध खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खरांगणा पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here