पेट्रोलपंप हटावा या मागणीकरीता भीमटायगर सेनेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना निवेदन! जिल्हा उपाध्यक्ष विशाल नगराळे यांचे नेतृत्व

पवनार : वर्धा येथील पेट्रोलपंप स्तलंतरीत करावा या मागनीकरीता गेल्या ६ महिन्यापासून आंबेडकर अनुयायी आंदोलन करीत आहे. मात्र शासनाकडून याची कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने हा मुद्दा चिघळत चाललेला आहे. या मुद्द्यावरुन येथील भीम टायगर सेना पवनार तर्फे आमदार पंकज भोयर यांनी घेराव घालण्यात आला. आमदार पंकज भोयर हे पवनार येथे पशू रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाकरीता पवनार येथे आले असता त्यांना घेरवा घालून निवेदन देण्यात आले. हा मुद्दा शासन दरबारी लाऊन धरावा अशी यावेळी मागणी करण्यात आली.

तसेच मागील अनेक वर्षापासून येथील पाळीव वरहांचा गावातील नागरीकांना नाहर त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यामुळे पुर्ण गावात गंधगी पसरलेली आहे याबाबत वरहाचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले मात्र याचा बंदोबस्त आजपर्यंत झाला नाही. वरहा पाळणारा व्यक्ती हा कोणालाही जुमानत नाही आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त करावा ही मागनीही करण्यात आली आहे.
यावेळी पवनार शाखा अध्यक्ष रवीभाऊ चाटे, गणेशभाऊ खेलकर, अनुप नगराळे, सहादेव चाटे, उमेश नगराळे, नंदकिशोर उमाटे व आदी कार्यकर्ते उस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here