सर्वसामान्यांना मोठा फटका! 15 दिवसांत 50 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

राहुल खोब्रागडे

वर्धा : वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. बुधवार (ता. १) सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण असताना आता सरकारने जनतेला आणखी एक झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 25 रुपयांनी महागल्याने सामान्य नागरीकांना सिलेंडर विकत घेणे कठीण झाले आहे.

घरगुती गॅसच्या किमतीत यावर्षी 2021 मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. जानेवारी सोडून इतर जवळपास सर्व महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्य जनता आता महागाईमुळे त्रस्त झालेली आहे. मात्र सरकार दरवाढ करुन करुन जनतेला माहागाईच्या दरीत ढकत चाललेली आहे.

सिलिंडरचे दर वाढल्याचा परिणाम महिला वर्गावरच अधिक झाला आहे. त्यांच्या संसाराचे चक्रच बदलले आहे. या दरवाढीचा परिणाम सर्व स्तरावर होतो आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले असताना. सिलेंडरचे दर वाढल्याने सिलेंडर भरुन आनने आवाक्याबाहेर असल्याने पुन्हा चूलीचा सहारा घ्यावा लागत आहे.

कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले, रोजगार गेले त्यामुळे आधीच नागरीक त्रस्त आहे कसाबसा संसाराचा गाढा ओढत असताना आता दिवसेनदिवस सिलेंडरची होत चाललेली दरवाढ ही परवडणारी नाही. या गँस सिलेंडर दरवाढी विरोधात आता नागरीकांच्या तिव्र प्रतिक्रीया उमटत आहे.

…………………………….

‘अच्छे दिन’चा वादा करीत मोदी सरकारने गरीबांच जगन कठीण केल १५ दिवसात ५० रुपयाने सिलेंडरचे भाव वाढवीले ही भाववाढ सर्वसामान्य नागरीकांना परवडनारी नाही. या भाववाढीमुळे अनेकांचे बजेट बीघडलेले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उज्वला गॅस कनेक्शन मिळाले होते त्यानंतर मात्र महिलांना गॅस सिलेंडर भरुन आणताच आला नाही त्यांना पुन्हा चूलीचाच सहारा घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या दरवाढीचा प्रचंड विरोध पहायला मिळत आहे.

प्रतिक्रीया…

आतापर्यंत कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त होती आणि आता मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दरवाढीने लोकांचे जगणे कठीण झालेल आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेची चालविलेली लूट थांबवावी जीवणावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेत जनतेला दिलासा द्याला.

शकुंतला नगराळे, ग्रामपंचायत सदस्य पवनार

एकीकडे रोज जीवणावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहे मात्र दुसरीकडे रोजगार नाही, मजूरीत वाढ नाही, महागाईच्या तुलनेत अत्यल्प मजूरी मिळते, गरीब जनता कसबस पोटाला चिमटा घेत घर चालवतो मात्र सिलेंडरच्या सततच्या होत चाललेल्या दरवाढीने आमचे जगने कठीण करुन टाकले आहे.

आरती काशीकर, गृहिणी, पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here