

वर्धा : भारतीय खाद्य निगम येथे कामगारांनी विविध मागण्या घेऊन कामबंद आंदोलन केले. नागपूर येथील मंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत एफसीआय डेपोत काम करणाऱ्या नोंदीत कामगारांच्या प्रलंबित विविध मागण्या व तक्रारीबाबत लवकरात लवकर निर्णय घेवून ते सोडविण्यात याव्या या मागण्यांसाठी आज सकाळपासून कामगारांनी कामबंद आंदोलन केले.
कार्यालयामार्फत त्याचा पाठपुरावा मे.गुरू गजानन अण्ड कंपनी, कंत्राटदाराकडे तातडीने करण्यात यावा, कामगारांनी सुट्टीच्या दिवशी १३ मे रोजी केलेल्या कामाचा, मंडळाच्या परिपत्रकानुसार, दुप्पट दरानी अद्याप वेतन कामगारांना दिलेले नाही ते त्वरीत मंडळात भरणा करन्याचा आदेश जाहीर करा, जेणेकरून कामगारांना सदर थकीत असलेले वेतन लवकर मिळेल.
जर कंत्राटदारानी १३ मे रोजी कामगारांनी केलेल्या कामाचे परिपत्रकानुसार दुप्पट वेतन त्वरीत मंडळात जमा न केल्यास कंत्राटदाराला ” पेमेंट क्लियरन्स प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
सदर झालेल्या विलंबामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष असून त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो असेही यावेळी कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी चंदू चव्हाण, गजानन सेलुकर, गजानन उके, विलास वाटगुळे, रमेश मस्के, गणेश राऊत, अमोल वानखेडे, शाम राऊत, गोविंद ठाकरे, मंगेश नेहरे, दिनेश चमलाटे, अरविंद ठाकरे, गणपत सोनुले आदीची उपस्थिती होती. मागण्या मान्य होई पर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहील असेही सांगण्यात आले आहे.