दहेगाव स्टेशन टी-पॉईट परिसरात तिहेरी अपघात! मनुष्यहानी नाही; वाहनांचे नुकसान

चिकणी (जामणी) : नजीकच्या दहेगाव स्टेशन येथील टि-पॉईट परिसरात कार, बस आणि ट्रकचा अपघात झाला. यात कुणी जखमी झाले नसले तरी तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. एम.एच. ४९ ए. ई. ५४०३ क्रमांकाची कार नागपूरच्या दिशेने जात होती. समोरून ट्रेलर येत असल्याने कार चालकाने ब्रेक मारला, दरम्यान मागाहून येणाऱ्या एम. एच. ४० ए. क्यू. ६२७१ क्रमांकाच्या बसने कारला तर बसच्या मागे असलेल्या एम. एच.१४ सी. यु. ६७५४ क्रप्नांकाच्या ट्रकने बसला जबर धडक दिली.

कार मध्ये चालक रवींद्र डाफ यांच्यासह एकूण सहा व्यक्ती होते. ते व इतर वाहनचालक थोडक्यात बचावले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे सतीश दरवरे, दुर्गेश बावणे, विजय वंदिले यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here