कारच्या धडकेत स्कूलबस उलटली! ५ विद्यार्थी जखमी

वर्धा : दहा ते बारा शाळकरी विद्यार्थी घेऊन वायगाव येथे सोडून देण्यास जात असलेल्या स्कूलबसला भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या घडकेत स्कूलबस चालकाने स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने स्कूलबस रस्त्याकडेला जाऊन उलटली. या अपघातात बसमधील पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

हा अपघात १७ रोजी वायगाव नि. येथील चौफुली परिसरात झाला. याप्रकरणी देवळी पोलिसांनी कारचालकाला अटक केल्याची माहिती दिली. निधी उमेश बाळसराफ, देवश्री नीलेश कावळे, अनिकेत प्रकाश पाईकराव, प्रणव प्रकाश पाईकराव, नमीता दिनेश वरघने (सर्व रा. वायगाव) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव असल्याची माहिती वायगाव पोलिस चौकीतील पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रथमेश दिलीप वालदे (२०, रा. वायगाव) हा त्याची (एमएच 3२ एजे ०१८६) क्रमांकाची स्कूलबसमध्ये ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूलचे दहा ते बारा विद्यार्थी बसवून वायगाव नि. येथे सोडण्यासाठी जात होता. वायगाव चौरस्ता ओलांडत असतानाच देवळीकडून वर्ध्याकडे भरधाव जाणाऱ्या कारचालकाने निष्काळजीपणे व हयगयीने कार चालवून स्कूलबसला जबर धडक दिली. या अपघातात स्कूलबस रस्त्याकडेला उलटली. या अपघातात पाचविद्यार्थी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वायगाव पोलिस चौकीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेत कारचालक विपीन लक्ष्मीकांत मीरानी (रा. वायगाव) याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here