
आर्वी : मुलीला मारहाण करत घरातील साहित्याची दोघांनी फेकाफेक केली. धनोडी बहादूरपूर येथे ही घटना घडली. मंदा मुडे हिची मुलगी सुनीताला श्रावण मसराम व त्याची पत्नी घर बांधकाम येथे नको करू, असे म्हणत शिवीगाळ करीत होती. दरम्यान, श्रावणने काठीने सुनीताला मारहाण केली असता मंदा मुडे वाद सोडविण्यास गेली असता श्रावण आणि त्याच्या पत्रीने शिवीगाळ करत घरातील साहित्याची फेकाफेक केली. याप्रकरणी आर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली, या प्रकरणाचा पुढील तपास आर्वी पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत आहे.



















































