अन्‌ वडिलाने मुलाच्या हातावर मारले ब्लेडने चिरे! आईला वाचविणे मुलास भोवले

वर्धा : कूलर दुरुस्तीच्या कारणातून आई-वडिलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या मुलाच्या हातावर चक्क वडिलांनीच ब्लेडने सपासप वार करीत जखमी केल्याची घटना अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळेगाव टालाटुले येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, सूरज गवळी हा घरातील कूलरची दुरुस्ती करत असतानाच घरात असलेले वडील राजू गवळी याने कूलर दुरुस्त करायचा नाही, मला बिल भरावे लागते असे म्हटले. दरम्यान, मुलगा सूरज याने मी बिल भरतो असे म्हटले असता राजूच्या पत्रीने राजूला तुम्ही कशाला कूलर दुरुस्तीसाठी मनाई करता असे म्हटले असता संतापलेला राजू पत्रीस मारण्यास धावला. दरम्यान, मुलगा सूरज वाद सोडविण्यास मध्यस्थी करण्यास गेला असता राजूने रागाच्या भरात सूरजच्या हातावर ब्लेडने सपासप वार करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास अल्लीपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत असून घरगुती हिंसाचारात काही दिवसांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here