अल्पवीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

आर्वी: घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत पीडितेवर बळजबरी करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आर्वी शहरात घडली.या घटनेने चांगलीच खळबळ उडाली. आर्वी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
पीडितेचे आई – वडिल कामावर गेल्याने १४ वर्षीय मुलगी घरी होती. ती स्थानगृहातून घरात गेली असता आरोपी हेमंत शंकर बोरकर रा. श्रीहरी कॉलनी याने अनधिकृतपणे पीडितेच्या घरात प्रवेश केला.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेवर बळजबरी करुन तिला ओढत नेले. पीडितेने आरडाओरड केली असता आरोपीने तिचे तोंड दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने आरोपीच्या हाताला झटका देत तेथून कसाबसा पळ काढला. शिवाय शेजारी राहणाऱ्या महिलेला बोलाविले. तोपर्यंत आरोपी हेमंत याने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. पीडितेने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितल्यावर घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार आर्वी पोलिसांत दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी हेमंतविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here