“आय लव्ह यू म्हण, अन्यथा कुटुंबाला जीवे ठार मारेन!’

पुलगाव : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे… तु जर मला आय लव्ह यू म्हटले नाहीस तर मी तुला सोडणार नाही, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला जीवे ठार मारेन अशी धमकीच मजनूने दिल्याने युवतीच्या तक्रारीवरुन पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या एकतर्फा प्रेमातून युवतींचा छळ केल्या जात असल्याच्या घटना सातत्याने घडत चालल्या आहेत. एकतर्फा प्रेमातून हिंगणघट येथील जळीतकांडाने संपूर्ण देश हादरून गेला असताना या घटना थांबता थांबत नसल्याने मानसिकता बदलण्याची गरज आहे.

पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला प्रमोद नामक युवक वारंवार फोन करुन माझ्यावर प्रेम कर मला आय लव्ह यू म्हण असे म्हणून त्रास देत होता. युवती घराबाहेर कामानिमित्त निघाली असता प्रमोदने पुन्हा तिचा पाठलाग करुन माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुझ्या कुटुंबातील सदस्यांना जीवे ठार मारेन अशी धमकीच दिली. अखेर घाबरलेल्या युवतीने याबाबतची तक्रार पुलगाव पोलिसात दिली असून पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here