सामोरा सामोर धडकल्या दुचाकी! मांगली मार्गावर पुन्हा झाला अपघात : एक गंभीर, एक किरकोळ

सिंदी (रेल्वे) : शेतातून घरी परतणाऱ्या काळबांडे पिता- पुत्राच्या मोटार सायकलला विरुध्द दिशेने येणार्या दुचाकीने जबर धडक दिली यात एमएच ३२ एएफ -७४५४ वर स्वार व चालक विशाल काळबांडे (२४) याचे डोक्याला खोल व गभीर स्वरुपाची जखम झाली. वडील गुलाबराव यांना किरकोळ मार लागला. सदर घटना कवठा शिवारातील मंदिरापुढे आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. जखमी विशाल काळबांडे यास सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलेले आहे.

याबाबद माहिती देताना गुलाब काळबांडे म्हणाले की मांगली शिवारातील शेतातील काम आटोपून कमी वेगाने आम्ही घरी येत होतो. सिंदीवरुन बरबडीकडे जाणार्या वाहन क्रमांक एम एच३२ एबी- ७०६३ धारकाने सुसाट वेगाने व बेदरकार आमच्या बाईकला धडक मारली. या दुर्घटनेत मुलगा विशाल यास डोक्याला व पोटाला गंभीर जखम झाली आहे. कुणी तरी विशाल याला तातडीने सेवाग्राम येथे रवाना केल्याचे सांगीतले मला स्थानिक खासगी वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करुन घरी पाठवले आहे. विशालवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
या अपघाताचे ठिकाण बेला पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात येते. वृत्त लिहिल्या जाईपर्यंत बेला पोलिस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. या आठवड्यातील या मार्गावरील ही तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here