शेतकरी थकला हो…….! दीड वर्षे लोटली : अवाजवी बील चालूच; महावितरनला जाग आलीच नाही

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : दीड वर्षापासून शेतातील फाॅल्टी मीटर बदलुन देण्यासाठी मौजा हेलोडी शिवारातील शेतकरी झिझवतो आहे महावितरणचा उंबरठा….!!
मात्र महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्याला देत आहे दिड वर्षापासून अवाजवी अॅवरेज बील….!

सविस्तर वृत्त असे की सिंदी रेल्वे येथील रहिवासी प्रशांत कवडुजी कामडी नामक शेतकरी ज्यांची वडिलोपार्जित शेती मौजा हेलोडी शेत सर्वे ६७ क्रमांकाची वडील कवडु वाघोबाजी कामडी नावाने महसुल विभागात नोंद असलेल्या शेतातील विहरीवर महावितरनची वीजजोडणी आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक ३९०२९००३०६५२ हा असुन या क्रमांकाच्या ईलेक्ट्रांनीक मीटरचा दिड वर्षापासून डिस्प्ले गेला असल्याने रिडींग घेता येत नाही. परिणामता महावितरन विभाग श्री कामडी यांना अवाजवी ऐवरेज बील पाठवित आहे.

विशेष म्हणजे या शेतकर्याचे बारमाही ओलीत नसुन केवळ सोयाबीन निघाल्यावर हरबरा पीकाला फक्त दोन पाणी देण्यापुर्तेच ओलीत असते आणि ऐवढाच अल्पशा विजेचा वापर करतात. मात्र अॅवरेज बील पोहचले १२ हजार ५७० रुपयावर……!

यासाठी श्री कामडी यांनी महावितरणच्या सिंदी रेल्वे कार्यालयाला २६/११/२०१९ ला पहीला तर ३०/६/२०२० ला दुसरा आणि १७/८/२०२० ला तिसरा असे तीनदा अर्ज करुन फक्त बिघडलेले मीटर बदलुन बीघडण्या पुर्वीच्या विज बीला नुसार बील देण्याची वारंवार विनंती केली आहे मात्र निगरगट्ट महावितरन प्रशासन अद्याप त्यांची मीटरची ही समस्या निकाली काढु शकली नाही.
विशेष म्हणजे सर्व महावितरणची वीज वापरणारे ग्राहक वीज जोडणी घेतांना वीज वापर दर्शविणारे मीटर महावितरन कडुन विकत घेतात. शिवाय प्रत्येक बीलासोबत मीटर भाडे सुध्दा भरतात मात्र महावितरणने लावलेले मीटर ग्राहकाची कोणतीही चुकी नसतांना बिघडले असेल तर ग्राहकाला हा नाहक त्रास का? मीटरचे भांडे जर ग्राहक दर महीण्याला देतो आहे तर ते मीटर दुरुस्ती किवा बदली करुन देण्याचा भुदंड ग्राहकांना का भरावा लागतो आणि अॅवरेज बीलाच्या नावावर महावितरनची ही लुटमार दंडुकशाही ग्राहकांना अजुन किती काळ सोसावी लागणार असा अनेक विज ग्राहकांना प्रश्न पडतो आहे मात्र विजेची सर्वाना नितांत गरज असल्याने आणि या क्षेत्रात एकाधीकार असल्याने ग्राहकांची गळचेपी होत आहे. शासणाने याकडे लक्ष देऊन ही गळचेपी थांबवावी अशी अनेक अॅवरेज बीलची झड बसलेल्या महावितरन ग्राहकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here