१९ जानेवारीला होणार चार नगरपंचायतींची मतमोजणी! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची जिल्ह्यात होणार प्रभावी अंमलबजावणी

वर्धा : जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, कारंजा व आष्टी येथील नगर पंचापयतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. मध्यंतरी न्यायालयाने ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसींसाठी राखीव असलेल्या प्रभागांना वगळून निवडणूक घेतली जात होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगीत नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याचे आदेशित केले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या या १४ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. यासोबतच २१ रोजीला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी आता एकाच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला होणार एकूणच पूर्वी मतपेटीत राजकीय भविष्य सीलबंद झालेल्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी तब्बल २८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here