परीक्षेच्या नावावर घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी परतलीच नाही! अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा कुटुंबियांचा संशय

वर्धा : परीक्षा असल्याची बतावणी करून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी रात्री उशीर होऊन ही घरी न परतल्याने तिला अज्ञात व्यक्‍तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना वर्धा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वाठोडा धामणगाव येथे उघडकीस आली.

अल्पवयीन पीडित मुलगी ही बोर्डाचे पेपर असल्याने महाविद्यालयात जात असल्याचे तिच्या आईला सांगून घराबाहेर पडली. महाविद्यालयाची वेळ संपून बराच कालावधी झाला, पण मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मुलीच्या मित्र-मैत्रिणींकडे विचारणा केली. शोध घेऊनही मुलीचा पत्ता न लागल्याने अखेर हतबल झालेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन गाठून आपल्या मुलीला कुणी तरी अज्ञात व्यक्‍तीने फूस लावून पळविल्याचा संशय व्यक्‍त करीत तशी तक्रार नोंदविली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here