
मयुर अवसरे
विजयगोपाल : नजीकच्या चोंडी विजयगोपाल शिवारामध्ये अस्वल दिसल्याने लगतच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वप्रथम उमेश मारोटकर या युवकानला अस्वल दिनांक 13 मे रोजी दिसली. त्याने वनविभागाला याची माहिती दिली त्यानंतर चोंडी येथील मुन्ना धीरण यांनीसुद्धा अस्वल शिवारात असल्याची माहिती वनविभागाला दिली वन विभागाला अजूनही अस्वलीला पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाला माहिती देऊन सुद्धा वनविभागाचे कर्मचारी काही ठोस ऍक्शन का घेत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील गावकरी आपला जीव मुठीत घेऊन जगात आहे. परंतु वनविभाग गावकऱ्यांनी दिलेली माहिती लपवून वरिष्ठांना अंधारात ठेवून गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे गावातील नागरिकांचा आरोप आहे.
काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावकऱ्यांना गावालगतच्या शिवारात अस्वल दिसली असता जवळपास 200 गावकर्यांनी आस्वरालीला घेरले व वन विभागाला फोन केला वनविभागाचे कर्मचारी गावांमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रात्रीची वेळ असल्यामुळे अस्वलीला पकडण्यास असमर्थता दाखवल्यामुळे गावकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अस्वल दाखवून सुद्धा तिला हाकलून द्या आम्ही नन्तर पकडेल अशी वनविभागाची भूमिका गावकऱ्यांना पटणारी नाही त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वनविभागावर व्यक्त होत आहे.
वनविभागाकडून परिसरातील ग्रामपंचायतीला पत्र देऊन अस्वल असण्याने गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांना विचारणा केली असता वनविभागाला अस्वलाला पकडण्याची परवानगी ही वरिष्ठांकडून घ्यावी लागते. जोपर्यंत हे अस्वल काही नुकसान पोहचवणार नाही तोपर्यंत आपण ती परवानगी मागू शकत नाही वनविभाग अस्वलावर्ती लक्ष ठेऊन आहे. गावकऱ्यांनी सतर्क राहावे असे त्यांनी यावेळी सांगितले.