

हिंगणघाट: चारित्र्यावर संशव घेत पत्नीच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. यात विवाहिता गंभीर जखमी झाली. लाडकी गावात ही घटना घडली. प्रशांत उराडे याला दारूचे व्यसन असून तो संशयी वृत्तीचा आहे. प्रशांत नेहमीच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून वाद करीत असे तसेच तिला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत असे. विवाहिता घरी असताना प्रशांत घरी आला आणि तु दुसरे लग्न करणार आहे असे म्हणत शिवीगाळ करीत वाद घातला तसेच काठीने डोक्यावर जबर मारहाण केली. दरम्यान सासू सासरे वाद सोडविण्यास आले असता त्यांनाही धक्काबुक्की केली. अखेर विवाहितेने याप्रकरणी पती प्रश्नांत उराडे याच्याविरूद्ध हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.