अट्टल चोरट्याला अटक! सावंगी मेघे पोलिसांची कारवाई

वर्धा : सावंगी मेघे पोलिस ठाणे हद्देतील मौजा धोत्रा रेल्वे शिवारातील शेतातून मोटारपंप, पाईपसह इतर शेतीसाहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्याला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी यशवंत बळीराम कामडी रा. वॉर्ड नं.02, सालोड हिरापूर यांच्या तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादीने मक्‍त्याने केलेल्या शेतीतील 14 प्लॅस्टिक पाईप, 8 स्प्रिक्लर नोझल, विहीरीतील पाण्याची मोटार असा 9,100 रूपयांचा माल 21 मार्चच्या रात्री दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार दिली होती.

सदर गुन्हयाचा तपास पथकाने करून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी सुरेश रामभाऊ घोगरे (वय 45) रा. धोत्रा रेल्वे यास अटक केली. त्याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेले 14 प्लास्टिक पाईप, 8 स्प्रिक्लर नोझल व विहिरीतील पाण्याची मोटार असा १ हजार 100 रुपयांचा माल जप्त केला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके,उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या निर्देशाप्रमाणे मल्हारी ताळीकोटे, विजय पंचटिके, प्रशांत वंजारी, यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here