स्लॅब कोसळली! गिरोले कुटुंबीय बचावले; लाख रुपयांचे नुकसान

समुद्रपूर : येथील वॉर्ड मधील रहिवासी संजय वासुदेव गिरोले यांच्या घराच्या स्लॅबचा काही. भाग अचानक कोसळला. घटनेच्यावेळी घर कुलूपबंद होते. त्यामुळे गिरोले कुटुंबीय थोडक्यात बचावले असले तरी या घटनेमुळे गिरोले त्यांचे तब्बल एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

संजय गिरोले हे कुटुंबीयांसह काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान गिरोले यांच्या घराची स्लॅब अचानक कोसळली. यात कलर, टीव्ही, विक्रीसाठी असलेले 3० मोठे माठ, खुर्ची, पलंग, रंगरंगोटी मशीनचे नुकसान झाले आहे. अचानक जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. कुंभार समाजाचे संजव गिरोले हे उन्हाळ्यात माठ विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशातच ही घटना घडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here