जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांस सश्रम कारावास! जिल्हा न्यायालयाचा निकाल

वर्धा : दारूच्या कारणावरून वाद करून मारहाण करीत थेट अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवून सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा जिल्हा न्यायाधीश-२ व्ही. पी. आदोणे यांनी दिला. न्यायाधीश व्ही, पी. आदोणे यांनी आरोपी लखन मनोहर लडी आणि बिरजू नरेश लडी (दोन्ही, रा. सालोड (हिरापूर) यांना भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये पाच वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम ३८२, ३४ अन्वये एक महिन्याचा कारावास व ५०० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक आठवड्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादीच्या मृत्युपूर्व बयानावरून सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात आरेपींदिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार गजानन कोपरकर यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू अँड. एच. पी. रणदिवे यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here