सेवाग्राम पोलिसांची मांडवगड बेड्यावर धाड! लाखो रुपयांचा दारुसाठा नष्ट

वर्धा : पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मांडवगड (बेडा) शिवारात दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून ५ लाख ७२ हजाराचा कच्चा मोहा सडवा, गावठी दारुसाठा नष्ट करण्यात आला. दारूबंदी कायद्यान्वये ही कारवायी करण्यात आली.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे मारोती कातकर, विठ्ठल दुधकोहळे, हरिदास काकड, नितीन राजपुत, सचिन सोनटक्के, मंगेश झामरे, कारभारी घुगे, मनोज लोहकरे, किशोर पेटकुले, गजानन कठाणे, संजय लाडे, वैभव चरडे, रामेश्वर नागरे, गुणवंत सुरकार, वृंदा टाके यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here