1.12 लाखाचा दारूसाठा नष्ट! सेलू पोलिसांची कारवाई

सेलू : अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर सेलू पोलिसांनी कारवाई करीत 1.12 हजारांचा दारूसाठा जप्त करून नष्ट केला. ही कारवाई सेलू पोलिसांनी बेलगाव शिवारात बोर नदी काठावर केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सतीश दशरथ मते (42 रा, जोशीनगर सेलू) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मौजा बेलगाव शिवारात बोर नदी काठावर गावठी दारू काढण्यासाठी कच्चा मोहा रसायन सडवा तयार केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सेलू पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता मोक्‍यावर आरोपी सह गावठी दारू काढण्यासाठी कच्चा रसायन सडवा आढळून आला. यात या प्रकरणी एकाला ताब्यात घेत पाच लोखंडी ड्म मध्ये 1 हजार लिटर कच्या मोहा रसायन सडवा हटभट्टीसाठी लागणारे साहित्य असा 1 लाख 11 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्‍यावर नष्ट करण्यात आला. ही कारवाई वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार तिरुपती राणे, पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वणवे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here