भरधाव कारचालकाने वृद्ध दुचाकीस्वारास चिरडले! हळदगाव पाटीवर अपघात; पोलिसात गुन्हा दाखल

समुद्रपूर : दुचाकीने जात असलेल्या वृद्धाला भरधाव कारचालकाने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील हळदगाव पाटीजवळ घडली.

मारोतराव दादाराव ठाकरे (७०) रा. खंडाळा, असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दुचाकीने नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरुन हळदगावकडून समुद्रपुरला येत होते. यादरम्यान चंद्रपूर येथून नागपुरला जाणाऱ्या एम.एच.३४ बी.व्ही. ३६६३ क्रमांकाच्या कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत मारोतराव ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठूनपंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. कारचेही मोठे नुकसान झाले असून या घटनेचा पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here