

पवनार : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वच्छता हीच सेवा हे अनोखे अभियान जाहीर केले आहे. हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार रविवार (ता. १) जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, जल्ह्यातील सामाजीक संघटना सकाळी १० वाजताच्या सुमारास पवनार येथील नदीपरीसरात स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करीत हे अभियान यशस्विरीत्या पार पाडले.
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधिक्षक नूरुल हसन, तहसिलदार श्री कोळपे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी यांनी यावेळी हजेरी लावली होती. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना या प्रेरणादायी उपक्रमाची माहिती देत स्वच्छतेचे महचत्व सांगत हातात झाडू घेत कचरा गोळा करत परीसर स्वच्छ केला. यावेळी हजारो हातांनी एकत्रीत येत या अभियानात आपला सहभाग नोंदविला होता.
पवनार ग्रामपंचायत व सामाजिक संघटनेच्या वतीने संयुक्तरीत्या धाम तीरावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात हजारो हातानी सहभाग घेतला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत स्वच्छता अभियान यशस्वी केले. या मोहिमेत बाबूराव बांगडे विद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, बचत गट ग्रामपंचायत सदस्य यांनी योगदान दिले. मात्र काहींनी हातात झाडू घेत फक्त फोटो सेशन केल्याचेही दिसले