महामार्ग रस्त्यालगत असलेल्या विहरित आढळला मृतदेह! पवनार येथिल घटना

पवनार : वर्धा नागपूर रोड वर पवनार लगत श्रीकांत बांगडे यांचे शेतात रस्त्याला लागून असलेल्या विहरीत अनोळखी मृतदेह आढळला वरून पाहता सदर मृतदेह हा तरुणाचा असल्याचे दिसून येते. येणाऱ्या दुर्गंधीमुळे हा मृतदेह तीन चार दिवसापूर्वी चा असावा असा कयास बांधला जात आहे. मृतकाचा चेहरा हा विहिरीतील मासोळ्याने खाल्लेला दिसून आला. महामार्ग रस्त्यालगत असलेल्या या मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सेवाग्राम पोलीस प्रयत्न रत आहे. ही आत्महत्या की घातपाताचा प्रकार हे तपासाअंती निष्पन्न होईल. मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, उपनिरीक्षक ठाकूर, जामदार पांडे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here