कृषी दिनानिमीत्य भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

अमरावती : कृषि शास्त्र समुह महाराष्ट्र, कृष्णार्पण फाऊंडेशन अमरावती तसेच श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्या मार्फत आज भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित आले. वसंतराव नाईक यांच्या जंयती निमित्याने महाराष्ट्रात कृषि दिन म्हणुन साजरा केला जातो त्या निमित्ताने श्री शिवाजी कृषी महाविद्यालय येथे वृक्षारोपण तसेच कृष्णार्पण अभ्यासिकेच्या प्रांगणात वृक्षारोपण तसेच शेतकरी व सामान्य जनते करिता भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ. सुलभाताई खोडके आमदार, अमरावती विधानसभा तसेच मान्यवरं श्री अमोल ठाकरे, सिनेट सदस्य तसेच जिल्हा अध्यक्ष (शिक्षण सेल ग्रामीण), गजानन ठाकरे अध्यक्ष, कृष्णार्पण फाऊंडेशन यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरवात भारतीय संस्कृती प्रमाणे दीप प्रज्वलन करून झाली.

अध्यक्षीय भाषणात माननीय आमदार सुलभाताई खोडके यांनी रक्तदान शिबिर कोरोना काळात आयोजित केले या बद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच वृक्षारोपण करून प्राणवायूची उपलब्धता वाढते त्या मुळे जास्तीत जास्तीत लोकांनी वृक्षारोपण करावे असा संदेश दिला. अश्या जनता हिताच्या कामात भविष्यात सदैव मदत करणार याची ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि शास्त्र समुह अध्यक्ष, निखिल यादव तसेच कृषी महाविद्यालयाचे रा. से. यो. प्रमुख डॉ दीपक पाडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती प्रांगणात विद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकिशोर चिखले, डॉ समीर लांडे, कीटकशास्त्र प्रमुख, नोडल ऑफिसर प्रकाश साबळे, डॉ दुर्गे सर अश्या समस्त प्राध्यापक वर्गाणी झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचे भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर ठाकरे यांनी केले.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here