ज्वलनशिल पदार्थ टाकून महिलेस दिले पेटवून! जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न

अल्लीपूर : बळजबरी घरात शिरुन महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या व्यक्‍तीला विरोध केल्याने संतापलेल्या नराधमाने महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून महिलेला पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना अल्लीपूर गावात ५ रोजी घडली. जखमी महिलेवर सेवाश्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांनी दिली.

महिला ही घरात एकटीच आराम करीत असताना गावातीलच रहिवासी आरोपी विठ्ठल संतोष ढेंगरे (५१) याने तिच्या मोबाईलवर फोन करुन तू काय करते आहे, असे विचारुन अवघ्या काही मिनिटांनी आरोपी महिलेच्या घरी आला. त्याने दार ठोठावले महिलेने दार उघडले असता आरोपी विठ्ठल याने महिलेला धक्काबुक्की करीत बळजबरी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने याला प्रतिकार करीत विरोध करुन आरडाओरड करुन तुझ्या पत्नीला ही बाब सांगायला जाते, असे म्हटले. दरम्यान संतापलेल्या विठ्ठलने रागाच्या भरात ख्रिशातून ज्वलनशील पदार्थ असलेली काचेची बाटली काढून महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आगडल्बीतील काडीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपी विठ्ठल ढेंगेरे याला अटक केली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here