
लहान आर्वी : रस्त्यावर वाढलेल्या झुडपामुळे समोरील रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन दुचाकीचा अपघात झाल्याची घटना लहान आवीं ते अंतोरा रोडवर घडली. या अपघातात आजीसह तिचा नातू गंभीर जखमी झाला आहे.
तळेगाव (शा.पं. ) येथील महिला तेजश्री टाक (70) या नातू सुरेंद्रिसिंग भादा (27) याच्यासोबत दुचाकीवरून आष्टी येथे अंत्यविधीसाठी जात होत्या. रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झुडपामुळे अंदाज आला नसल्याने समोरून येणा-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला व हाताला जबर दुखापत झाली असून त्यांना नजीकच्या अंतोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
तेथील वैद्यकीय अधिकारी पायल वरके यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मोर्शी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले आहे. सदर रोड हा 5 किमीचा असून या रोडवर दोन्ही बाजुने झाडं-झुडपं वाढल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रोडवर अपघात होत आहेत. पंरतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.