

वर्धा : शहरातील विविध भागात रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची विक्री केली जात आहे. पीओपीच्या गणेशहामूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा कुंभार कारागीर एकता संघाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली.
मुख्याधिकाऱ्यांनी पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. शहरात पीओपीच्या गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक नीलेश किटे, वीरू पांडे, जिल्हाध्यक्ष अरुण वाल्दे, विक्की ठाकरे, राकेश चौधरी, ताराचंद्र कुदेवाल, श्रीकांत कपाट, दिनेश प्रजापती, चंदन प्रजापती, ओमप्रकाश अंभेरे, सुरेश बोरसरे, विनोद बोरसरे, गजानन प्रजापती आदी उपस्थित होते.