वर्धा जिल्ह्यातील पवनार ग्रामपंचायत क्षेत्रात बर्ड- फ्ल्यूचा प्रादुर्भाव! जिल्हाधिका-यांनी दिले प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश

वर्धा : जिल्ह्यातील पवनार ग्रामपंचायत परिसरातील बदकाचे अहवाल बर्ड फ्ल्यू ने बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बाधित जागेपासून १ किलोमिटरच्या त्रिज्येतील भाग हा संक्रमित क्षेत्र म्हणून तर १० किलोमिटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र हे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला आदेश दिले आहेत.

पवनार ग्रामपंचायत क्षेत्रामधील बदक पक्षाचे अहवाल बर्ड फ्ल्यू चाचणी साठी पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थान आनंद नगर, भोपाळ येथून प्राप्त अहवालात सदर पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संक्रमित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्म मधील पक्षी आणि इतर प्रजातीच्या पाळीव पक्षी यांची वर्धा जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त यांच्या अंतर्गत स्थापित शीघ्र कृतिदलामार्फत पक्षी मारण्याची क्रिया करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिले आहेत.

सोबतच मृत पक्ष्यांची विल्हेवाट मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात यावी, संक्रमित क्षेत्रातील पक्षी खाद्य, पक्षी खाद्य घटक, अंडी, अंड्याचे पेपेर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षी खत, विष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करावी. तसेच संक्रमित क्षेत्रात पक्षी मारल्यानंतरची स्वच्छता, निर्जंतुकीकरण इत्यादी मोहीम पूर्ण झाल्यावर पक्षी/ चिकन आणि अंडी विक्रीची दुकाने सुरू करण्यास आणि यामध्ये सुद्धा फक्त सर्वेक्षण क्षेत्रामधील उत्पादित उत्पादनांना परवानगी राहील. सर्वेक्षण क्षेत्रामध्ये बाहेरून येणा-या व बाहेर पाठविण्यात येणाऱ्या चिकन प्रक्रिया उत्पादने, पक्षी खाद्य, अंडी यांच्या हालचाल, विपणन आणि विक्रीवर ३ महीने बंदी लागू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here