मजुरीच्या मोबदल्यात पतीच्या मित्राकडून विवाहितेचे शोषण! सेलू येथील घटनेने परिसरात खळबळ

वर्धा : पतीच्या मजुरीचा मोबदला मागण्यास गेलेल्या विवाहितेचे पतीच्याच मित्राने शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सेलू येये उघडकीस आला. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून, एकच खळबळ उडाली. याप्रकरणी २६ रोजी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली.

पीडित महिलेच्या पतीच्या मजुरीचा मोबदला मागण्यासाठी ती पतीचा मित्र आरोपी रिंकू शेख (३०) याच्याकडे गेली होती. मजुरीचे पैसे परत देण्यासाठी पीडितेने त्याला विचारणा केली असता, आरोपी रिंकूने पीडितेला शरीर सुखाची मागणी केली. पीडिता पैसे मागण्यास गेली असता तीला पैसे न मिळाल्याने ती परत रिंकू शेखकडे गेली असता त्याने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पीडितेचे शोषण करुन तिला पैसे दिले. मात्र, आरोपी रिंकू शेख हा वारंवार पीडितेला धमकावुन पतीला ही बाब सांगण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करुन त्याने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. अखेर पीडितेने ही बाब पोलिसांपुढे कथन केल्यानंतर सेलू पोलिसांनी आरोपी रिंकू शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here