दुचाकीची धडक! अपघातात एक ठार; दोन जखमी

समुद्रपूर : महामार्ग क्रमांक 44 ने जामकडून हिंगणघाटकडे विरुद्ध दिशेने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात चालक जागीच ठार झाला, तर दोनजण जखमी झाले. ही घटना 6 डिसेंबरच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास पी. व्ही. टेक्स्टाइल्ससमोर घडली. लोकेश भोजराज धाबेकर (वय 32) रा. जाम, असे मृताचे नाव आहे. सौरभ दिलीप पाटील (वय 22) व नितीन हंसराज ढाले (वय 35) तिन्ही रा. जाम, हे जखमी झाले आहेत.

दुचाकी क्रमांक एम. एच. 32 आर 5139 ने टि्पल सिट राँगसाईड पी. व्ही टेक्स्टाइल कंपनीजवळून जाम हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ने जात असताना एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत लोकेश भोजराज धाबेकर रा. जाम हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मृत्यूंजय दुत जय गौरखेडे यांनी जाम पोलिस चौकीला माहीती दिली. महामार्ग पोलिस केंद्र जाम येथील सपोनि स्नेहल राऊत, पोउपनि सुधाकर कमरे, पोहवा सनील भगत, सुधाकर बावणे, भारत पिसुडे, अजय बेले, प्रवीण चव्हाण, गणेश पवार व चालक नागेश तिवारी यांनी वाहनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून हायवे अँम्बुलन्सच्या व मृत्युंजयदूताच्या मदतीने मृतास हायवेच्या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल केले. जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करून वाहतूक सरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here