वादातून भावावर केले ब्लेडने वार! पोलिसात तक्रार दाखल

अल्लीपूर : आईला शिवीगाळ करण्यास हटकले असता संतापलेल्या भावाने भावाच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करीत जखमी केले. अल्लीपूर येथे ही घटना घडली. आकाश पद्माकर ढोबळे याची आई शेतातून काम आटोपून घरी गेली असता अंकित ढोबळे याने पैशाचा तगादा लावला. पैसे नसल्याचे सांगितले असता अंकित शिवीगाळ करू लागला.

आकाशने शिवीगाळ करण्यास हटकले असता अंकितने ब्लेडने आकाशवर वार करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या घरगुती कलहातून वादाच्या घटना घडताना दिसून येत आहे. यातच पुढे मोठी गंभीर घटना घडत असल्याने वेळीच याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here