

सेलू : येथील वॉर्ड क्रमांक चारमधील शंकरजी मंदिर परिसरात शिव पार्वती सभागृहालगत असलेल्या विहिरीत 70 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी 26 डिसेंबर रात्री 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वासुदेव पाहुणे, रा. सेलू असे मृताचे नाव आहे.
सेलू येथील वाॅर्ड क्रमांक चार मध्ये असलेल्या शंकर यांच्या मंदिर परिसरातील विहिरीत इसमाचा मृतदेह तरंगताना लोकांना दिसून आला. या घटनेची चर्चा होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच रात्र पाळीत कर्तव्यावर असलेले ‘पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाळे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता वासुदेव पाहुणे असल्याचे मृतकाच्या पत्नीने ओळखले.
मृतकाला बर्याच दिवसापासून कानाचा त्रास होता. त्या त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाळी. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी मर्ग केला असून पुढील तपास उपनिरीक्षक गजानन कंगाळे करीत आहे. मृतकाचे पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे.