युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वर्धा : सेलू येथील आठवडी बाजार परिसरात राहत असलेला युवकाने बाजारातीलच टिनाच्या शेडला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रफिक मज्जीत शेख (४२) रा. सेलू असे मृताचे नाव आहे. त्याने बुधवारी सकाळी आठवडी बाजारातील टिनाच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी निसार मुस्ताक सय्यद यांनी सेलू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून या तक्रारीच्या आधारे नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here