सत्याग्रही घाटात कंटेनर उलटला! चालक-वाहक बचावले

तळेगाव (श्या.पंत.) : अमरावतीकडून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरला जंगली श्वापद आडवे गेले. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन उलटला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास झाला.

एम. एच. ३७ टी. १९९८ क्रमांकाचा कंटेनर राष्ट्रीय महामार्गाने अमरावतीवरून नागपूरकडे जात होता. सत्याग्रही घाटात अचानक जंगली श्वापद आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक दाबले. त्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन महामार्गाच्या मध्यभागी उलटला. यात कोणालाही दुखापत झाली नसून चालक-वाहक सुखरूप बचावले.

या अपघातामुळे एका बाजूची वाहतूक काहीकाळ प्रभावित झाली होती. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार आशीष गजभिये यांच्या मार्गदर्शनात जमादार संदीप महाकाळकर व मनोज आसोले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here