ट्रँकरचालकाने घेतला गळफास! वडनेर पोलिसांनी घेतली नोंद

वडनेर : तेलंगाणा राज्यातून खाद्यतेल घेऊन कानपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रँकरचालकाने वडनेर शिवारातील धाब्याशेजारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अब्दुल हमीद शेख असगर अली शेख (५०) असे या चालकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले,

अब्दुल हमीद शेख असगरअली शेख हा तेलंगाणा राज्यातील जोगीपेठ येथून एमपी. एचपी ४३५६ क्रमांकाचा खाद्यतेलाचा ट्रँकर घेऊन निघाला होता. पिपरी-गांगापूर मार्गावरील ढाब्याजवळ तो विश्रांतीसाठी थांबला होता. अज्ञातच त्याने परिसरात कुणी नसल्याचे हेरून गळफास घेत आत्महत्या केली.

मंगळवारी सकाळी ही घटना क्लिनर अब्दुल रशीद अब्दुल हमीद शेख याच्या लक्षात येताच त्याने परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वडनेर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here