उद्या हनुमान जन्मोत्सवानिमीत्य पवनारात भव्य शोभायात्रा! बबलू राऊत यांचे आयोजन

पवनार : येथे दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमीत्य विश्व हिंदु परिषद- बजरंग दल जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्या अध्यक्षतेत शनिवार (ता. १६) सायंकाळी ६ वाजता दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोभायात्रा पुरातन हनुमान मंदिर परिसरातुन निघून संपुर्ण गावात ही शोभायात्रा निघेल या शोभायात्रेत विविध प्रकारच्या झाकी, चिमुकल्यांची वेशभूषा तसेच ढोल ताशांच्या गजरात सपन्न होणार आहे. या शोभायात्रेत मोठ्या संखेने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक बबलू राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here