आर्वीतील कदम रुग्णालयात पाच तास खोदकाम! गर्भपात प्रकरण

वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणात पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी भेट दिली. तसेच, या प्रकरणाची तथ्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. येथे घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी पोलिसांच्या नजरेत असणाऱ्या कदम रुग्णालयात आज पुन्हा खोदकाम करण्यात आले. आज या रुग्णालयाच्या आवारातील विहिरीत सुमारे पाच तास खोदकाम सुरु होते. विहिरीच्या खोदकामात काय सापडले याबाबतची कसलीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here