भरधाव अज्ञात वाहनाने चिरडल्याने युवकाचा मृत्यू! वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल

वडनेर : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत वाहनाच्या चाकाखाली येत युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर येथील सिरसगाव ते आजनसरा चौरस्त्यावर शनिवारी १२ रोजी दुपारच्या सुमारास झाला. योगेश विनायक भोयर (२१) रा. चिंचमंडल, ता. मालेगाव, जि. यवतमाळ असे मृताचे नाव आहे.

योगेश हा एम. एच. २९ बी. एन. ४६२९ क्रमांकाच्या दुचाकीने डवलापूर येथून चिंचमंडला त्याच्या गावाला जात होता. दरम्यान, सिरसगाव ते. आजनसरा चौरस्त्यावर मागाहून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, योगेश वाहनाच्या चाकात चिरडल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वाहनचालकाने तेथून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्ट यांच्या मार्गदर्शनात अमित नाईक, लक्ष्मण केंद्रे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here