पवनारात घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याकडून १ लाख ६० हजार रूपये लंपास : सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल

पवनार : येथील राधा सिटी परिसरात अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश करीत १ लाख ६० हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी ९ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत बाबाराव तेलराधे हे सकाळी कामावर गेले होते, व पत्नी गावातच राहत असलेल्या त्याच्या वडिलांकडे गेल्या असता यादरम्यान अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील ठेऊन असलेले नगदी ७० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रशांत तेलराधे यांच्या तक्रारी वरून सेवाग्राम पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here