अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्‍टर जप्त! महसूल पथकाची कारवाई; चालकांविरुद्ध केले गुन्हे दाखल

अल्लीपूर : अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना महसूल पथकाच्या भरारी पथकाने दोन ट्रॅक्टर जप्त करून चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात आणून उभे केले.

मागील बर्‍याच महिन्यांपासून रात्रीच्या काळोखात हिंगणघाट तालुक्‍यातील वाळू चोरट्यांद्वारा वर्धा, वेणा, यशोदा नदीपात्रातून सर्रास वाळू उपसण्याचे काम जोमात सुरू आहे. हा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी हिंगणघाट येथील तहसीलदार सतीश मासाळ यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचे भरारी पथक तयार करून वाळू चोरीवर काहीसे नियंत्रण आणले आहे.

१७ रोजी पोहणा पिपरी दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाळूची चोरी आणि वाहतूक करणारे सुरेश इटनकर आणि बादल धवणे यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्‍टर संजय भोंग, मंडळ अधिकारी, तलाठी सय्यद अहमद, प्रमेसिंग बिमरुट, रामा घवघवे, प्रवीण गिरडे यांच्या भरारी पथकाने जप्त करीत जप्त करुन तहसील कार्यालयात दंडात्मक कारवाई करण्यासाठी जमा केले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here