दुचाकी चोर मुद्देमालासह अटकेत! पोलिस विभागाची कारवाई

वर्धा : हिंगणी येथुन आपल्या बजाज डीस्कव्हर मोटरसायकल क्र. एमएच ३२ व्ही ०६३४ ने वर्धा येथे कोहीनुर हॉटेल येथे गेले असता त्यांनी आपली मोटरसायकल हॉटेल समोर उभी केली असता चोरट्यांनी ती पळवुन नेली. जेवण करून हॉटेल बाहेर आले असता, गाडी ठेवल्या ठीकाणी दिसुन आली नसल्याने राहुल महादेव कोहळे, रा. हिंगणी यानी वर्धा शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाकडून दुचाकी चोरी करणारा चोरट्याचा छडा लावकत जेरबंद केले.

तसेच फिर्यादी राजेश गुलाबराव माथनकर, रा. बॅचलर रोड, वर्धा यांनी तक्रार दिली की, त्यानी त्यांची टीव्हीएस मोटर सायकल क्रमांक एमएच ३२ एक्स ७९५१ किंमत ३०,०००/- रू. आपले घरासमोर उभी करून ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अशा फिर्यादीचे तोंडी रिपेार्टवरून वर्धा शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दोन्ही गुन्हे तपासावर असतांना मुखबीर कडुन मिळालेल्या माहितीवरून आरोपी पंकज कवडुजी डबुरकर, वय २४ वर्ष, रा. पवनार याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हयातील चोरीस गेलेली बजाज डीस्कवर मोटर सायकल क्रमांक एमएच ३२ व्ही ०६३४ किंमत १३,०००/- रूपये, टीव्हीएस मोटर सायकल क्रमांक एमएच ३२ एक्स ७९५१ किंमत ३०,०००/- रूपये, एक हीरो होन्डा पॅशन मोटर सायकल क्रमांक एमएच ३१ एसडब्लु ७१८६ किंमत अंदाजे ३०,०००/- रूपये, एक टि.व्ही.एस. स्कुटी पेप जांभळया रंगाची क्रमांक एम.एच.३२-बि.एल. ९२२३ किंमत १०,०००/- रू अशा एकुण चार गाडया जुमला किंमत ८३,०००/- रू चा माल जप्त करून आरोपीला गुन्हयात अटक करण्यात आली.

ही कार्यवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे संजय पंचभाई, पोहवा सचिन इंगोले, नापोशी. दिपक जंगले, सचिन दवाळे, राजेंद्र ढगे, शाम सलामे व सुनिल मेंढे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here