
योगेश कांबळे
देवळी : तालुक्यात अवैधरित्या रेती गौन खणिजाची उत्खनन तथा वाहतूक करित असल्याचे निदर्शनास आल्याने एक ऑक्टोंबर पासुन अवैधरित्या रेती या गौन खनीजाची वाहतूकीवर प्रतिबंध लावण्याकरीता तसेच त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याकरीता देवळी तहसील कार्यालय अंतर्गत सहा मंडळाकरीता प्रत्येक मंडळ निहाय एका पथकाची असे एकूण सहा पथक ज्यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिस शीपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या पथकाव्दारे एक ऑक्टोबर पासुन एकूण पंधरा वाहन अवैधरित्या रेती वाहतुक करीत असल्याने त्याच्यावर कारवाई करुन वाहन तहसील कार्यालय , देवळी येथील प्रांगणात लावण्यात आलेले आहे. या अवैध पंधरा वाहनांवर एकूण १८ लाख ४३ हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी ५ वाहनांचे सहा लाख चौदा हजार पाचशे रूपये दंड वसूली करण्यात आलेला असून उर्वरीत दहा वाहनांवर १२ लाख एकोणतीस हजार रूपये दंड भरणे प्रलंबित आहे.
देवळी तालुक्यातील मौजा आंजी येथील नदीकाठावर ५५ ब्रास व मौजा कांदेगाव येथील नदीकाठावर ३० ब्रास असे एकूण ८५ ब्रास अज्ञात व्यक्तीव्दारे अवैध रेती साठा केलेल्या असल्याचे नियुक्त पथकांना आढळून आलेले असुन रेतीसाठा खाजगी वाहनाव्दारे तहसील कार्यालय, देवळीच्या प्रांगणात आणले असुन लीलावासबंधीची कार्यवाही करण्याची परवानगी उपविभागिय अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे.
कार्यवाही करण्याकरीता तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार, राजेंद्र देशमुख, श्रीमती बाळुताई भागवत, पुलगावचे नायब तहसीलदार उल्हास राठोड पुलगाव, मंडळ अधिकारी, तलाठी कोतवाल, पोलिस शीपाई यांनी परीश्रम घेतले असून अवैधरित्या गौन खणिजाची उत्खनन व वाहतूक करण्यार्यावीरुध्द यानंतरही कठोर कारवाई येणार असुन त्याची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नसल्याचे तहसीलदार राजेश सरवते यांनी स्पष्ट केले आहे.