
हिंगणघाट : धारदार व टोकदार लोखंडी खंजर बाळगून सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण करणा-या प्रतिक उर्फ पोपट गजभिये (21) रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट यास 24 डिसेंबर रोजी दुपारी अटक करण्यात आली आहे.
याबाबत गुन्हे प्रगटीकरण पथकाचे विवेक बनसोड यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्यांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन प्रतिक उर्फ पोपट भारत गजभिये यास ताब्यात घेतले त्याच्याकडून एक धारदार व टोकदार लोखंडी खंजर (किंमत 200 रुपये ) जप्त करण्यात आले. सदर युवकाविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे व उमेश बेले यांनी केली.