8 जुगाऱ्यांना रंगेहाथ केली अटक! सिंदी रेल्वे येथे छापा; खासगी शिक्षकासह संचालकावर गुन्हा दाखल

सिंदी (रेल्वे) : येथील मुख्य मार्गावरील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आठ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांत एका खासगी शिक्षकाचा तसेच खरेदी-विक्री संस्थेच्या संचालकाचा समावेश आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बजरंग रामचंद्र पाटील यांच्या घरी छापा टाकला. यावेळी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे ठाणेदार वंदना सोनूले यांच्या नेतृत्वातील पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी जुगारी हेमंत उर्फ बजरंग पाटील (46 ), खासगी शिकवणी वर्ग घेणारे शिक्षक बालू उर्फ शरद ज्ञानेश्‍वर तळवेकर (47), खरेदी-विक्री संस्थेचे संचालक मुकेश नारायण ढोक (52), संदीप उर्फ बालू गोविंद दुप्पलवार (48), रबी केशव बेलखोडे (40), मंगेश बबन बेलखोडे (38), उमेश मारोतराव नखाते (50) व मनोज ज्ञानेश्‍वर देवतळे (45) याला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 5 दुचाकींसह एकूण 1 लाख 55 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार वंदना सोनूले यांच्या नेतृत्वात मनोहर चांदेकर, संजय भगत, संदेश सयाम, शीतल मुन, शुभांगी चाफले, सचिन उईके यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here